राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे महिलांच्या शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी प्रगतीचे साधन ठरत असले, तरी डीपफेक आणि सायबर छळासारख्या धोक्यांपासून डिजिटल सुरक्षितता राखणे काळाची गरज बनले आहे. याच पार्श्वभूमीवर 'एआय सखी' उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणाची एक व्यापक साखळी देशभरात निर्माण केली जाईल, असा विश्वास राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशोदा एआय उपक्रमांतर्गत 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला' या विषयावरील क्षमता बांधणी कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., राज्य महिला आयोगाच्या सदस्या सचिव नंदिनी आवाडे, राष्ट्रीय महिला आयोगाचे संचालक रामअवतार सिंह, उपसचिव डॉ. पद्मश्री बेनाडे,
आत्मविश्वास वाढविणे हा 'यशोदा एआय' उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. माहिती संकलन व विश्लेषण, आरोग्य सेवा, तपास प्रक्रिया तसेच दैनंदिन प्रशासकीय कामांना एआयमुळे गती मिळू शकते. कामाच्या स्वरूपानुसार एआयचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. महिला उद्योजक व बचत गटातील महिलांनीही एआयचा उपयोग व्यवसायवृद्धीसाठी करावा, व्यवसायासाठी प्रभावी संदेश तयार करणे, समाजमाध्यमांवर प्रचार करणे तसेच व्यवसायाशी संबंधित सर्जनशील साहित्य तयार करण्यासाठी एआयची मदत घेता येते. महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती असणे आवश्यक असून बालविवाह आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ यांसारख्या समस्यांविरोधात संघटितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महिलांनी दैनंदिन वापरात एआयचा कसा उपयोग करायचा, याविषयी स्मिता कासार तसेच सायबर सुरक्षा विषयावर उन्मेष जोशी, 'पॉश' जनजागृती विषयावर दिपाली श्रीवास्तव आणि डिजिटल मार्केटिंग विषयावर शिवम गर्ग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
आवाज, चित्रफितीवर विश्वास ठेवू नका
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून हुबेहूब आवाज व चित्रफिती तयार करून फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे अशा आवाजावर किंवा चित्रफितीवर तत्काळ विश्वास न ठेवता त्याची खात्री करणे आवश्यक आहे. आभासी जगातील सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती व आवश्यक दक्षता महत्त्वाची आहे. 'यशोदा एआय' उपक्रमातील मार्गदर्शन महिलांना सक्षम करण्यास उपयुक्त ठरेल, असे सुदीप जैन यांनी सांगितले.
उपायुक्त कृष्णा राठोड, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी कोमल कोरे, व्याख्याते उन्मेष जोशी, स्मिता कासार आदी उपस्थित होते.
रहाटकर म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्याची बाब नसून वर्तमानातील गरज आहे. महिलांचे डिजिटल सक्षमीकरण, सुरक्षितता व














